UPI पेमेंट ही सर्वात सोपी पद्धत आहे.
म्हणूनच आजकाल सर्व प्रकारची पेमेंट करण्यासाठी फक्त UPI अॅप्सचा वापर केला जातो. परंतु अनेक वेळा जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत जास्त असते, तेव्हा ती खरेदी करण्यासाठी आपण EMI चा पर्याय निवडतो, त्यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा जुगाड करावा लागतो. पण आता तुम्ही फक्त UPI च्या माध्यमातून EMI वर वस्तू खरेदी करू शकणार आहात.
खरं तर ICICI बँकेने आता UPI पेमेंट करताना QR कोड स्कॅन करून मासिक EMI वर वस्तू खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बाय नाऊ पे लेटर या सुविधेचा वापरकर्ते लाभ घेऊ शकणार आहेत.