२०२२ मध्ये महाराष्ट्र राज्याचा विकास दर ९.१ टक्के नोंदला गेला होता. चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) हा दर ६.८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
कृषी आणि सेवा ह्या दोन मुख्य क्षेत्रातील घसरण राज्याचा विकास दर खाली आणण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या विकासात महत्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
मात्र बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगती दिलासादायक आहे.