५ एप्रिल २०२३ रोजी सोन्याचे भाव सर्वोच्च स्तरावर पोहोचले. दिवसभरात सोन्यात १,०२५ रुपयांची वाढ होऊन १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹ ६१,०८० झाला. हा सोन्याच्या किंमतीतील सर्वोच्च भाव आहे.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, आज कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे दर वाढण्यामागे पाच प्रमुख कारणे सांगण्यात आली.
१) अमेरिकन डॉलरच्या दरातील कमजोरी
२) अमेरिकन बाजारातील खराब आकडेवारी
३) अमेरिकेतील वाढत असणारे व्याजदर
४) आंतरराष्ट्रीय स्तरावरतील आर्थिक अनिश्चितता
५) कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती
टेक्निकल तज्ञांनी भारतातील सोन्याच्या किमतीला ₹५९,५०० स्तरांवर मजबुती दर्शविली आहे.
त्याचप्रमाणे चांदीला प्रति किलो ₹ ७०,००० किलो स्तरावर मजबुती दर्शविली आहे.