दैनंदिन जीवनात जेव्हा आर्थिक नियोजनाची वेळ येते तेव्हा आपल्या समोर अनेक पर्याय उभे असतात. उदा. म्युचल फंड, रिअल इस्टेट, सोने, चांदी इ. परंतु या सर्व गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना आपण जोखिम नियोजन ( रिस्क प्लॅनिंग ) याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. सध्य स्थिती चा विचार केल्यास ( कोविड ची जागतिक महामारी) रिस्क प्लॅनिंग खुप आवश्यक आहे.
रिस्क प्लॅनिंग हे दोन प्रकारात विगाभले गेले आहेत
१) जीवन विमा
२) सामान्य विमा
या लेखामध्ये आपण या दोन्ही प्रकारांचा संक्ष्पित आढावा घेऊया.
१) जीवन विमा - आपल्या जीवन शैली मध्ये झालेला बदल आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जीवन विमा हे आर्थिक नियोजनाची पहिली पायरी समजली जाते.
जीवन विमा मुख्यतः पाच प्रकारात विभागला जातो.
अ) मुदत जीवन वीमा ( टर्म इन्शुरन्स) - एका ठराविक काळासाठी हा विमा काढला जातो. ज्यामध्ये कमी प्रिमियम भरून अधिकच विमा संरक्षण ग्राहकाला दिले जाते.
आ) संपूर्ण जीवन विमा - या विमा प्रकारात ग्राहकाला त्याच्या संपूर्ण जीवन काळासाठी किंवा वयाच्या १०० वर्षांपर्यंत जीवन विमा संरक्षण दिले जाते.
इ) एन्डोमेंन्ट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी - या विमा प्रकारात ग्राहकाला सेव्हिंग प्लॅस इन्सुरन्स असा दुहेरी फायदा मिळतो. हा विमा ग्राहकाला मर्यादीत काळासाठीच दिला जातो.
ई) मनी बॅक विमा पॉलिसी - या प्रकारात ग्राहकाला जीवन विमा संरक्षणासहित नियमित कालावधी नंतर त्याचा परतावा मिळतो.
उ) युनिट लिंक सेविंग स्किम ( युलिप ) - युलिप पॉलिसी ही शेअर मार्केटशी जोडलेली आहे. यामाध्ये ग्राहकाला जीवन विमा सहित अधिक परतावा मिळण्याची संधी असते.
२) सामान्य विमा - जीवन विमा व्यतिरिक्त सर्व प्रकारचे विमा संरक्षण या विमा अंतर्गत ग्राहक घेऊ शकतो.
अ) हेल्थ इन्शुरन्स ( आरोग्य विमा) - सर्वाधिक घेतला जाणारा हा विमा आहे. ज्यामध्ये ग्राहकाला त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या मेडिकल एक्सपेन्सचा परतावा विमा कंपन्यांकडून दिला जातो.
आ) मोटर विमा - दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी घेण्यात येणारा हा विमा आहे. यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे हे वाहनमालकासाठी बंधनकारक असते.
इ) मालमत्ता विमा (प्रॉपर्टी इन्शुरन्स) - चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग यासारख्या आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानी ची भरपाई करुन घेण्यासाठी हा विमा काढला जातो. यामध्ये गृह विमा, इमारत विमा, दुकान विमा इ. विमांचा समावेश होतो.
उ) प्रवासी विमा - इतर विमा पॉलिसीच्या तुलनेत हा अल्पकालीन असतो. यामध्ये प्रवासादरम्यान विविध वेळी आर्थिक संरक्षण ग्राहकाला प्रदान केले जाते. उदा. प्रवासादरम्यान सामान हरवल्यास किंवा त्याचे नुकसान झाल्यास, काही कारणास्तव ट्रीप रद्द झाल्यास किंवा प्रवासा दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास ग्राहकाला भरपाई दिली जाते. यामध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास या दोन्ही प्रकारच्या प्रवासांचा समावेश होतो.
पीक विमा - आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. असे असले तरीही आपल्या देशात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा अवकाळी पावसामुळे शेतीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा उपयुक्त ठरतो.