भारताच्या आयकर विभागाने सुमारे ८००० करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत ज्यांनी धर्मादाय ट्रस्टला मोठ्या देणग्या दिल्या आहेत.
आयकर विभागाशी संलग्न डेटा अॅनालिटिक्सने असे सुचवले आहे की हे करदाते त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या प्रमाणात देणग्या देत आहेत. त्यामुळे करचुकवेगिरीचा प्रयत्न केला असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे.
ज्या लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात पगारदार कर्मचारी, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि कंपन्यांचा समावेश आहे.
सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, "सर्व ८००० प्रकरणांमध्ये देणगी ही कर स्लॅब कमी करण्यासाठी किंवा पूर्ण सूट मिळविण्याच्या गरजे इतकी होती आणि ही देणगी स्वरूपी रक्कम रोखीने दिली गेली आहे.'
टीप - आर्थिक उत्पन्नावर कर सूट प्राप्त करण्याच्या हेतून देणगी देण्यास इच्छुक व्यक्तीने आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. जेणेकरून भविष्यात कायद्याच्या तरतुदींचे पालन करून सामाजिक उन्नतीसाठी आर्थिक मदत देता येईल.