भारती एअरटेलने 5G ग्राहकांसाठी 'अनलिमिटेड डेटा' ऑफर सादर केली आहे.
ऑफरचा मुख्य उद्देश ग्राहकांना Airtel 5G Plus नेटवर्कचा अनुभव देणे हा आहे. ही सेवा मिळविण्यासाठी ग्राहकाला एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन "क्लेम अनलिमिटेड 5G डेटा" पर्याय निवडायचा आहे. आणि सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
प्रीपेड आणि पोस्टपेड ह्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना Airtel 5G Plus नेटवर्कचा अनुभव घेता यावा; हे उद्दिष्ट कंपनीने जाहीर केले आहे.
हा लाभ ₹२३९ रुपयांवरील सर्व प्रीपेड रिचार्ज करणाऱ्या ग्राहक घेऊ शकतील. मात्र हा लाभ ₹४५५ आणि ₹१७९९ प्रीपेड रिचार्ज करणाऱ्यांना मिळणार नाही. पोस्टपेड वापरकर्ता दर महिन्याला बिल भरण्यास तयार असल्यास 5G सेवा घेऊ शकतो.
ग्राहकाने 5G सेवा लाभ घेण्यास सुरुवात केल्यानंतर गसक्रिय केल्यानंतर मोबाइल हॉटस्पॉट परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक वापरासाठी 5G सेवेचा लाभ दिला जाणार आहे. कोणीही 5G सेवेचा वापर करताना कंपनीची फसवणूक कर।याचा प्रयत्न केल्यास 5G सेवा बंद करण्यात येईल.