भारत हा विकसनशील अर्थव्यवस्थेतून विकसित अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करत आहे. मागील एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय व्यापार मंदावला असताना, आणि जागतिक पातळीवर महागाईचा दर वाढलेला असताना भारताची अर्थव्यवस्था उंचावत आहे.
अमेरिका आणि इतर प्रगत देशातील शेअर बाजारात मंदी असून देखील भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढत आहे.
'जी-२०'च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप पार पडला. यानिमित्त पत्रकार परिषदेत बोलताना गोयल म्हणाले, "मागील नऊ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पद्धतशीर विकास साधला असल्याचे उदाहरणादाखल सांगितले".