१२ एप्रिल २०२३ रोजी बाजाराने सलग आठव्या दिवशी आपला चढता क्रम सुरू ठेवला आहे.
शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 'सेन्सेक्स' २३५.०५ अंकांनी (०.३९%) वाढून ६०,३९२.७७ बंद झाला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा मुख्य निर्देशांक 'निफ्टी' ९०.१० अंकांनी (०.५१%) वाढून १७,८१२.४० बंद झाला.
दोन्ही निर्देशांक दिवसाच्या सुरुवातीला वाढण्याचे संकेत दे नव्हते. पण जसजसा दिवस पुढे जात होता तसतसा निर्देशांक वाढीचा वेग वाढला.
माहिती तंत्रज्ञान, ऑटो आणि फार्मा क्षेत्राच्या (सेक्टर)
समर्थनामुळे निर्देशांक दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाले.