FMCG क्षेत्रातील प्रमुख ITC कंपनीच्या शेअर्स ने ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. आत्ता शेअर बाजार व्यवहार चालू असताना दिवसभरात आय.टी.सी चा शेअर १.७% वाढला. आणि ५२ आठवड्याचा (एक वर्षाचा) उच्चांक स्तर देखील गाठला.
आय.टी.सी कंपनी चा शेअर त्यांच्या ५२ आठवड्यांचा नीचांक ₹२४९.२० पासून ६० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
सर्व ब्रोकरेज हाऊसेस कडून आय.टी.सी ची निवड होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक नफा मिळविण्यासाठी बारीक लक्ष ठेवून आहेत. नुकतेच मॉर्गन स्टेनली ब्रोकर हाऊस ने आय.टी.सी शेअर चे ₹४१५ टार्गेट सांगितले आहे.