नुकतेच आरबीआय ने एक सार्वजनिक बँक आणि दोन खाजगी बँकांना 'Too big to fail' (TBTF) जाहीर केले.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँक - एसबीआय
- खासगी क्षेत्रातील बँक - आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक
अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या तीन बँक आर्थिक संकटात अडकणार नाहीत. आणि जर ह्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागल्यास देशाच्या आर्थिक स्थितीवर भयंकर विपरीत परिणाम होईल.
त्यामुळे ह्या तीन बँकांवर आरबीआय चे बारीक लक्ष असते.
इतर बँकांच्या तुलनेत ह्या बँकांना अधिक कॅश पोझिशन ठेवावी लागते. तसेच कुठलेही मोठ्या रकमेचे कर्ज वितरण करण्यापूर्वी आरबीआय ची संमती घ्यावी लागते.
सर्व अटी पूर्ण करताना ह्या बँकांना सरकार कडून इतर आर्थिक फायदे देखील प्राप्त होतात.
टीप - आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बँकिंग क्षेत्रातील कंपनीचे शेअर (गुंतवणूक) घेताना ह्या तीन बँकांचा पहिला विचार करावा.