असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ने प्रदान केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील महिला गुंतवणूकदारांची संख्या डिसेंबर २०१९ मध्ये ४६.९९ लाखांच्या तुलनेत डिसेंबर २०२२ अखेर ७४.४९ लाख झाली.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीत युवा आणि मध्यम वयोगटातील गुंतवणूकदारांच्या संख्येत कमालीची वाढ दिसून आली आहे.
एकूण गुंतवणूकदारांपैकी सुमारे ३५% गुंतवणूकदार ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील आहेत. तर १८-२४ वयोगटातील गुंतवणूकदारांच्या टक्केवारी गेल्या १० आर्थिक वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे.
कोविड-१९ नंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. म्युच्युअल फंड मधील एकूण गुंतवणूकदारांची संख्या मार्च २०२० अखेर २.०८ कोटींवरून मार्च २०२३ अखेरीस ३.७७ कोटी झाली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एन.एस व्यंकटेश म्हणतात की, २०२२ मध्ये शेअर बाजारात तेजी नव्हती; तरीही सुमारे ४० लाख नवीन गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली.