ब्रिटानिया कंपनी ही देशातील आघाडीची बेकरी फूड कंपनी आहे. मागील वर्षा प्रमाणे ह्या आर्थिक वर्षात देखील कंपनीने शेअरधारकांना अंतरिम लाभांश जाहीर करून आनंदी केले.
०४ एप्रिल २०२३ (मंगळवारी) रोजी कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रति इक्विटी शेअर ७२ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला.
हा अंतरिम लाभांश शेअर च्या १ रुपये दर्शनी मूल्या
(फेस व्हॅल्यू) च्या टक्केवारीत गणल्यास ७२००% आहे.
अंतरिम लाभांश देण्यासाठी भागधारकांची पात्रता ठरवण्याची रेकॉर्ड तारीख १३ एप्रिल २०२३ आहे. म्हणजेच ह्या तारखेला आपल्या डिमॅट खात्यामध्ये ब्रिटानिया कंपनीचे शेअर्स हवेत.