महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा
५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपये अंदाजित खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत सादर करण्यात आला.
यंदाचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर म्हणजेच पाच मुख्य घटकांवर केंद्रीभूत आहे.
- शाश्वत शेती समृद्ध शेतकरी
- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास
- भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा
- रोजगारनिर्मिती
- पर्यावरणपूरक विकास