उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड चा आय.पी.ओ
सबस्क्राइब करण्याचा आज अंतिम दिवस होता.
(साध्या शब्दात सांगायचे झाल्यास कंपनी कडून शेअर्स मिळण्यासाठी शेअर्स खरेदी/बुकिंग करण्याचा शेवटचा दिवस)
शेवटच्या दिवशी (२३/०३/२०२३) उदयशिवकुमार इन्फ्रा
चा आय.पी.ओ १९ वेळा अधिक सबस्क्राइब झाला. रिटेल (सामान्य) गुंतवणूकदारांकडून १० वेळा अधिक शेअर्स खरेदीची बुकिंग झाली.
उदयशिवकुमार इन्फ्रा कंपनी कर्नाटक मध्ये रस्ते बांधकाम क्षेत्रात कार्य करते. ह्या आय.पी.ओ द्वारे कंपनीने ६६ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या भांडवलाचा उपयोग व्यवसाय वृद्धी करण्याच्या कामात करण्यात येणार आहे.
उदयशिवकुमार इन्फ्रा लिमिटेड, आय.पी.ओ
बाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती -
- २० मार्च २०२३ रोजी आय.पी.ओ सबस्क्राइब करण्यासाठी खुला झाला
- शेअर मुल्य श्रेणी (प्राईझ रेंज) ₹३३.०० -३५.००
- किमान शेअर्स ऑफर - ४२८ शेअर्स
- किमान गुंतवणूक - ₹१४,९८०/-
कंपनीचा १००% मालकी हक्क प्रमोटर्सकडे आहे.