नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून आयकर भरणाऱ्या व्यक्तीस नवीन घर खरेदी केल्यास दुहेरी वजावट फायदा घेता येणार नाही.
पूर्वी नवीन घर खरेदी केलेल्या व्यक्तीस दुहेरी वजावट फायदा मिळत होता. घर खरेदी केल्यावर (काही अटींची पूर्तता करून) त्यावर भरलेल्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काची दीड लाखापर्यंतची वजावट 'कलम ८० सी' नुसार त्याच्या उत्पन्नातून घेत असे. काही वर्षानंतर करदात्याने हे घर विकल्यास पुन्हा त्याची वजावट घेऊन भांडवली नफा मिळत होता.
आता ह्या दुहेरी वजावट घेण्यावर निर्बंध आणले आहेत. करदात्याने अशा काही वजावटी पूर्वी घेतल्या असतील. तर त्याची वजावट परत भांडवली नफा गणताना १ एप्रिल २०२३ पासून घेता येणार नाही.
म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्यांनी घर विकले असेल. त्यांना हा फायदा मिळाला. आता घर विकणाऱ्या व्यक्तीस हा (दुसऱ्यांदा मिळणारा) वजावट फायदा घेता येणार नाही.