आर.बी.आय ने सलग सहाव्यांदा रेपो रेट मध्ये वाढ केली. ह्याचा सामान्य व्यक्तीवर के परिणाम होतो?
आर.बी.आय चा रेपो रेट म्हणजे बँकेने आर.बी.आय कडून कर्ज घेतल्यास बँकेला द्यावे लागणाऱ्या व्याजाचे दर. बाजारातील पैशाची लिक्विडीटी राखण्यासाठी हे दर कमी-अधिक होत असतात.
हे व्याज दर वाढले. ह्याचा सामान्य व्यक्तीवर चांगला आणि थोडा त्रासदायक परिणाम होतो.
चांगला परिणाम म्हणजे बँकेतील मुदत ठेवी वरील व्याजदर वाढतात.
त्रासदायक परिणाम म्हणजे गृह कर्ज महागते.
सगळा खेळ लिक्विडीटी चा आहे. म्हणजेच खेळता पैसा व्यक्तीला लागतो; तशीच बँकांना देखील पैशाची गरज भासते. पैशांची गरज अधिक असल्यास बँक मुदत ठेवीचे दर वाढवते. हे दर वाढल्यामुळे ठेवीदार बँकेत पैसे ठेवतात.
आर बी आय कडून मिळणाऱ्या पैशाचे व्याजदर वाढल्यामुळे बँक देखील गृह कर्ज व्याज दर वाढविते.
थोडक्यात, व्यवहारी जीवनात अधिक आणि उणे ह्या दोन्ही बाजू एकाच वेळी निर्माण होतात.