केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यू.एस मध्ये आयएमएफ (IMF) ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले की, भारतात एकूण पेमेंट पैकी ६८% पेमेंट UPI द्वारे केले जात आहेत. मार्च २०२३ मध्ये ८.७ अब्ज UPI व्यवहार झाले.
मागील वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतामध्ये UPI व्यवहारांमध्ये एकूण ८२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
भारताने ४६२.५ दशलक्ष कमी किमतीची बँक खाती (low cost bank accounts) उघडली असून ५६% खातेदार महिला आहेत. यामुळे भारताला जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण प्रणाली तयार करून सरकारी सेवा वितरणात परिवर्तन करता आले आहे.
डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित थेट लाभ हस्तांतरण प्रणालीने सुमारे ६५० दशलक्ष लोकांना मदत केली आहे.