रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने रेपो दरात कुठलाही बदल न करता; रेपो दर ६.५% कायम ठेवला.
महागाईचा दबाव रोखण्यासाठी २०२२ च्या मे महिन्यापासून एकूण २५० बेसिस पॉइंट्स (२.५%) ने रेपो दरात वाढ झाली आहे.
आरबीआय च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) जागतिक बँकिंग संकटामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि संसर्गाचे धोके लक्षात घेऊन रेपो दर समान पातळीवर ठेवण्याचा निर्णय घेतला.