आम्ही कोण आहोत?

मराठी माणसानं गुंतवणूक करावी, मराठी माणसांनं पैसा कमवावा आणि मराठी माणसानं निर्धास्तपणे श्रीमंत व्हावं, या तीन गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून आम्ही काम करत आहोत. या तिन्ही गोष्टी साधण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती ‘आर्थिक नियोजन’. आमच्याकडे आर्थिक नियोजनाचे शेकडो मार्ग माहिती असलेली उत्तम टीम आहे. स्वतःचा उद्योग यशस्वीपणे करत असलेली माणसे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाने सतरंजी पाहून हातपाय न पसरता स्वतःची संतरंजी मोठी करावी अशी दुर्दम्य इच्छा आहे.

हे साध्य करण्याचे, गुंतवणुकीचे मार्ग काय आणि कोणते आहेत? तर त्यासाठी आम्ही शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूशन, रिअल इस्टेट आणि फूड अँड हॉटेल व्यवसाय या द्वारे विविध आर्थिक स्तरातील लोकांना सेवा पुरवितो. व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना फ्रेंचायजी द्वारे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून देतो.

शेअर्स, म्युच्युअल फंड योजना, रिअल इस्टेट, इन्शूरन्स आणि सरकारी गुंतवणूक योजनांचे मार्गदर्शन गेल्या दोन दशकापासून आम्ही विविध माध्यमातून करत आहोत.

ऑनलाईन कितीही माहिती मिळाली तरी अखेर एक यशस्वी आणि तज्ज्ञ व्यक्तीच दुसऱ्या व्यक्तीची खरी गरज आणि आवश्यकता ओळखू शकते. त्यामुळे एकदा ‘ध्यानीmoney.com’ वर प्राथमिक ओळख झाली की प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटून पुढील मार्गदर्शन करण्यावर आमचा भर असतो. त्यातूनच विश्वासाचे नाते तयार होते.

शेअर्स म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, शेअर मार्केट कसे चालते याबाबतच प्राथमिक माहिती ज्यांना नाही, त्यांचे बोट धरून त्यांना आम्ही ती देतो. ज्यांना ही माहिती आहे त्यांना प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या टप्प्याकडे जाण्यासाठी मदत करतो, तीही निःशूल्क. म्हणूनच आमचे म्हणणे आहे, ‘चला, श्रीमंत होऊ!’ कारण पैसा असेल तरच जग आहे.

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen