श्री केदारनाथ धामच्या यात्रेकरूंना हेलिकॉप्टर तिकीट बुकिंग सेवा देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉरपोरेशन (IRCTC) कंपनीने उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरण (UCADA) सोबत ५ वर्षांचा सामंजस्य करार (MOU) केला.
आयआरसीटीसी कंपनी हेलिकॉप्टर तिकीट बुक करण्यासाठी एक वेबसाइट (मोबाइल रिस्पॉन्सिव्ह) तयार करणार आहे. त्यामुळे यात्रेकरूंना त्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासासाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन तिकिटे बुकिंग करता येईल.