आज मिळणारा एक रुपया हा पुढील वर्षी मिळणाऱ्या एक रुपया हुन अधिक मूल्यवान असतो. कारण पैशाने पैसा निर्माण होतो. ह्या वास्तविक सूत्राचा अनुभव गुंतवणूकदार घेत असतो.
आपण पैशाची बचत विविध प्रकारे करत असतो. पण श्रीमंत होण्याची पहिली पायरी योग्य गुंतवणूक पर्याय आहे. आज लोकांना गुंतवणूक महत्त्व समजले आहे. म्हणूनच शेअर्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट मधील गुंतवणूकदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या वाढत्या वयासोबत आर्थिक गरजा देखील वाढत असतात. बचत केलेल्या पैशाने योग्य गुंतवणूक केल्यास भविष्यात पैशाचा स्रोत निर्माण होतो.
गुंतवणूक करताना विविध पैलूंवर विचार करणे देखील आवश्यक असते. त्यातील महत्वाचे मुद्दे -
- गुंतवणूकदाराचे वय, मासिक उत्पन्न आणि घरातील एकूण सदस्य
- गुंतवणूक करण्याचे मुख्य उद्दिष्ट
उदाहरणार्थ - मुलीचे लग्न, उतार वयात आर्थिक आधार, मोठं घर घेणे इत्यादी
- गुंतवणूक करण्याचा एकूण कालावधी
- दरमहा किंवा दरवर्षी गुंतवणूक करण्याची निश्चित रक्कम
- शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड द्वारे
अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेतुन अधिक परतावा (रिटन्स) मिळण्यासाठी अधिक जोखीम घेण्याची मानसिक तयारी असणे.
(बँक मुदत ठेवी सारख्या निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजने पेक्षा अधिक परतावा देण्याची सक्षमता शेअर मध्ये थेट गुंतवणूक आणि इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत आहे. पण शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडचा परतावा शेअर बाजारातील तेजी-मंदी वर अवलंबून असतो.)
- कर्ज घेतलेले असल्यास कर्ज परतफेड करण्याचा मासिक हप्ता.
आजच्या आधुनिक युगात श्रीमंत होण्यासाठी मानसशास्त्र तज्ञांचे मत देखील अंमलात आणले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्ती ज्या गोष्टीवर किंवा परिस्थितीवर मन केंद्रित करतो; तीच गोष्ट किंवा परिस्थिती त्याच्या जीवनात येते. आपण गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने योग्य गुंतवणूक पर्याय निवडल्यास गुंतवणूक केलेले पैसे वाढणार आहेत. हे कधीच विसरून चालणार नाही.