विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) २०१७ नंतर २०२३ मध्ये तीन विमा कंपन्यांना विमा व्यवसायासाठी परवाना दिला आहे.
जनरल इन्शुरन्स क्षेत्रात 'क्षेमा जनरल इन्शुरन्स' कंपनीला इरडा कडून विमा व्यवसाय करण्यास परवाना मिळाला आहे.
आयुर्विमा क्षेत्रात दोन विमा कंपन्यांना इरडा कडून विमा व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला आहे.
१. क्रेडिट अॅक्सेस लाइफ
२. अॅको लाइफ
इरडा चे मुख्य ध्येय आहे की, विमा कंपन्यांच्या संख्येत वाढ करून जास्तीत जास्त व्यक्तीं पर्यंत विमा सेवा पुरविणे.
विमा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक कंपन्यांचे आणखी २० अर्ज अपेक्षित आहेत, जेणेकरून विमा कंपन्यांची संख्या वाढेल, असा विश्वास इरडाचे अध्यक्ष देबाशीष पंडा यांनी सांगितले आहे.