LIC

12 Apr 2023;

postimage

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यावेळी अदानी समूहात एलआयसीने केलेली गुंतवणूक चर्चेत आली होती. मात्र, एलआयसीने समूहात गुंतवणूक त्यानंतरही वाढविली आहे. तब्बल ३ लाख ५७ हजार शेअर्स एलआयसीने खरेदी केले आहेत.

 

मात्र, मार्चमध्ये 'अदानी'चे शेअर्स वधारले. त्यामुळे एलआयसीची गुंतवणूक पुन्हा नफ्यात आली. 

एलआयसीने अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस मधील शेअर्स चा वाटा वाढविला.

एलआयसीचा समुहातील वाटा आता ४.२३ टक्क्यांवरून ४.२६ टक्के झाला आहे.

 

'अदानी'च्या शेअर्सचे भाव निम्म्याहून अधिक घसरले होते. अशावेळी एलआयसीने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. जानेवारीच्या अखेरपर्यंत एलआसीची गुंतवणूक ३० हजार कोटी रुपयांची होती. ती वाढली आहे.

 

याशिवाय इतर छोटे रिटेल गुंतवणूकदारही या पडझडीत मालामाल झाले आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास जानेवारीत २ लाख रुपयांची केलेली गुंतवणूक आता ७.४१ लाखांवर गेली आहे.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen