भारतातील आर्थिक सेवा क्षेत्र दिवसेंदिवस व्याप्त होत आहे. त्यामुळे अनुभवी व्यक्तींची गरज देखील वाढत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत विद्यार्थी पदवी प्राप्त करून विविध विद्यापीठातून बाहेर पडतात. पण प्रत्येक ऑफिस मध्ये कामाचा अनुभव असणाऱ्यांना पाहिले प्राधान्य दिले जाते. अशावेळी नोकरी मिळण्याची इच्छा असणारे कुमार वयातील २१-२५ वयोगटातील उमेदवारांकडे दोनच पर्याय असतात.
पर्याय १ - जी नोकरी मिळेल; ती स्वीकारायची.
पर्याय २ - नोकरी मिळत नाही म्हणून उच्च शिक्षण घेण्याचा घाट घालायचा.
दोन्ही पर्याय पाहिलेत तर दिसून येईल की, आजचा पदवीधर करिअर दृष्टीने गोधळलेल्या स्थितीत असतो.
नेमकं करायचं काय? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर लगेच उत्तर देतो. मात्र दिलेल्या मार्गावर चालण्याची जबाबदारी तुमची असेल.
ग्रॅज्युएशन नंतर लाखो रुपये खर्च करून एम.बी.ए केल्यानंतर प्लेसमेंट द्वारे नोकरी मिळते. ही नोकरी म्हणजे त्या कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही मदत करायची. साधा विचार करा..कुठली कंपनी तुम्हाला एक लाख दरमहा पगार देण्याचे कबूल करते; तेव्हा तुमच्याकडून दोन लाखांचे काम मिळवून देण्याची अपेक्षा करणारच आहे.
त्यापेक्षा ग्रॅज्युएशन नंतर थोडे पैसे स्वतःच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करून म्हणजेच योग्य सर्टिफिकेट कोर्सेस करून स्वतः च्या कष्टाच्या कमाईची सुरुवात करा. इकडे स्पष्टपणे नमूद करतो की, आम्ही तुम्हाला कोणताही कोर्स विकणार नाही.
आमचे मार्गदर्शन घेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणाहून सर्टिफिकेट कोर्स करू शकता.
तुम्ही आमच्यासोबत म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर, इन्शुरन्स एजंट, गुंतवणूक सल्लागार, ट्रेडिंग मार्गदर्शक आणि इतर बँकिंग सेवा देण्याचे काम देखील सुरू करु शकता. म्हणजेच पैसे कमवत देखील शिकू शकता.
आमच्याकडून तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इतर व्यवसाय कौशल्य कला वाढविणारे कोर्सेस बद्दल योग्य मार्गदर्शन दिले जाईल.