सिलिकॉन व्हॅली बँक (एस.व्ही.बी)२००८ च्या आर्थिक संकटानंतर अपयशी ठरणारी सर्वात मोठी यूएस बँक बनली.
एस.व्ही.बी फायनान्शियल ग्रुपला यूएस नियामकांनी बंद केल्यावर शुक्रवारी जागतिक बँकिंग आणि वित्तीय समभागांना मोठा फटका बसला. त्याच्यासोबत इतर कंपन्या, गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे अब्जावधी डॉलर्स अडकले.
अमेरिकन बॅंका देखील योग्य कर्ज व्यवस्थापन करतात. त्याच्याकडील उपलब्ध पैशाची अमेरिकन ट्रेजरी बिल आणि बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक होते. मग ही बँक का बुडाली? ह्याचे मुख्य कारण व्याज दरात सतत वाढ होत असल्यामुळे ही बँक आर्थिक दबाव रोखू शकली नाही.
इंटरेस्ट रेट स्वॅप ह्या हेजिंग पद्धतीचा वापर पूर्णपणे न केल्यामुळे अमेरिकेतील अनेक बँकांवर हे संकट घोंगावत आहे. सध्या १० वर्ष कालावधीचे यु.एस. बॉण्ड्स यिल्ड (परतावा दर) ५.५% वरून घसरून ३.५% पर्यंत कोसळले आहेत.
ह्याचा तात्पुरता दुष्परिणाम भारतीय शेअर बाजारातील बँकिंग आणि आय.टी. कंपन्यांच्या शेअर्स च्या किंमतीवर दिसून येत आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक संधी समजण्यास काहीच हरकत नसल्याचे मत भारतीय शेअर बाजार अभ्यासकांचे मत आहे.