सेबी कडून ASBA सुविधा शेअर बाजारात (Secondary Market) मध्ये सुध्दा लागू होणार.
ASBA (Applications Supported by Blocked Amount) सुविधेमुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यासाठीबँ केतून पैसे ट्रान्स्फर करावे लागणार नाही.
सध्या ही सुविधा आयपीओ प्रक्रिये मध्ये वापरण्यात येते. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास ASBA सुविधेमुळे गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी बँकेतून पैसे ट्रान्स्फर करावे लागत नाहीत. गुंतवणूक रक्कम निश्चित असल्यास तेवढी रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात गोठवली (ब्लॉक केली) जाते. त्यामुळे पैसे ट्रान्स्फर करण्याच्या प्रक्रियेत लागणारा वेळ वाचतो.
ASBA सुविधेमुळे शेअर बाजारातील रोखे व्यवहार अधिक प्रमाणात आणि जलद गतीने होतील. ह्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.