'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' च्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार, सराफ बाजारात सोने ५५५ रुपयांनी स्वस्त होऊन ६०,०६८ रुपयांच्या पातळीवर गेले. पाच एप्रिल रोजी सोन्याच्या दराने नवी उच्चांकी पातळी गाठली होती. त्या वेळी सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ६०,९७७ रुपयांच्या पातळीवर गेले होते.
१०/०४/२०२३ (सोमवार) - सोन्याचा भाव
- २४ कॅरेट - ₹६०,०६८
- २३ कॅरेट - ₹५९,८२७
- २२ कॅरेट - ₹५५,०२२
मागील वर्षी सोने गुंतवणूक तज्ञांकडून सोन्याचा भाव प्रति तोळा ६२,००० रुपये होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण ह्या वर्षातील सोन्याच्या किंमतीतील तेजी पाहता; येणाऱ्या काळात सोन्याचा भाव प्रति तोळा ६४,००० रुपये जाण्याचे संकेत मिळत आहेत.