आपले आधारकार्ड हे पॅनकार्ड सोबत लिंक (जोडलेले) आहे किंवा नाही; ह्याबद्दल मनात शंका असल्यास खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पडताळणी (चेक) करून पाहू शकता.
हे चेक करणं अगदी सोपं आहे. प्रथम आयकर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे.
Income Tax
https://www.incometax.gov.in/iec/foportal/
ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 'linked aadhar status' वर क्लीक करायचे आहे.
नंतर तुमचा आधार क्रमांक आणि पॅनकार्ड क्रमांक टाईप करावा. लगेच तुम्हाला View your aadhar status हे वाक्य दिसेल. त्यावर क्लीक केल्यावर तुम्हाला लगेच समजेल की तुमचे आधारकार्ड हे पॅनकार्ड सोबत जोडलेले आहे किंवा नाही.
जर तुमचे आधारकार्ड हे पॅनकार्ड सोबत जोडलेले नसल्यास ३१ मार्च २०२३ पूर्वी जोडून घ्यावे. अन्यथा १ एप्रिल २०२३ पासून पॅनकार्ड बंद पडेल.