मारुती सुझुकी कंपनीने IDFC FIRST बँकेसोबत सामंजस्य करार केला. ह्या करारामुळे बँक मारुती सुझुकी वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना नवीन कार लोन (वाहन कर्ज), प्री-ओनड कार लोन्स आणि कमर्शियल व्हेईकल लोन चे पर्याय देणार आहे.
IDFC फर्स्ट बँकेचे सीओओ, श्री मधिवानन बालकृष्णन म्हणाले, "ग्राहकांच्या वाहन खरेदी आणि वाहन कर्ज पुरवठा अनुभवास पूर्णत्वास नेण्यासाठी मारुती सुझुकीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक पॅन भारतातील सर्व शाखांमधील ग्राहकांना अखंड आणि सुलभ वित्तपुरवठा अनुभव देण्यासाठी डिजिटायझेशनचा वापर करते."