RBI ने पॉलिसी रेट मध्ये बदल न केल्यामुळे गुरुवारी (०६/०४/२०२३) सेन्सेक्स १४४ पॉइंट्स वाढला आणि निफ्टी १७,६०० पॉइंट्स च्या आसपास.
इतर क्षेत्रांचे निर्देशांक देखील वाढले. त्यामध्ये प्रामुख्याने रिअल्टी निर्देशांक ३% आणि ऑटो निर्देशांक १% वाढला.
फार्मा, भांडवली वस्तू, तेल आणि वायू, पॉवर क्षेत्राचे निर्देशांक प्रत्येकी ०.५% वाढले.
पण एफएमसीजी, आयटी आणि मेटल (धातू) क्षेत्राचे निर्देशांक ०.५% घसरले.