१ एप्रिल २०२३ पासून झाले मोठे बदल. ज्याचा थेट संबंध
सर्वसामान्य जनतेशी निगडित आहे. याबाबत थोडक्यात जाणून घेऊ.
१) १ एप्रिल २०२३ पासून ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
(२०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला; त्यावेळी ७ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्ती देण्याचे जाहीर झाले. पण नंतर असे लक्षात आले की, ज्याचे उत्पन्न ७ लाख हुन शंभर रुपये जास्त असले तरी किमान पंचवीस हजार कर भरावा लागेल.
ह्या श्रेणीत येणाऱ्या असंख्य करदात्यांच्या मनात संभ्रम होता; नक्की किती आयकर भरायचा.
ह्यावर रामबाण उपाय म्हणून सरकारने हे पाऊल उचलले.)
२) हॉलमार्क प्रणाली सुरू झाली. आता भारतात हॉलमार्कशिवाय सोने विकले जाणार नाही.
३) BS6 चा टप्पा 2 आजपासून लागू होत आहे, त्यामुळे सर्व कारच्या किमती ५% वाढणार आहेत.
४) १ एप्रिल पासून (जवळपास) सर्वच औषधांच्या किंमतीत १०% वाढ.
५) १ एप्रिल पासून महिला सन्मान योजना सुरू झाली. ह्या योजनेत महिलांनी दोन लाख रुपये जमा केल्यास दोन वर्षानंतर त्यांना २ लाख ३२ हजार रुपये मिळतील.
६) (मायक्रो) चिप असणाऱ्या भारतीय पासपोर्टची छपाई १ एप्रिल पासून सुरू झाली.
७) १ एप्रिल पासून खाली नमूद केलेल्या गाड्या (मॉडेल) बंद होणार -
Alto 800, Honda jazz, Hona WRV, Mahindra marrazo, Hyundai verna diesel, Skoda octavia and Tata altroz diesel.
८) १ एप्रिल पासून भारतात एक नवीन कर प्रणाली लागू होत आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूंचे दर बदलणार.