ओमानमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी कॅनरा बँक आणि NPCI भारत बिल पे लिमिटेड (NBBL) यांनी क्रॉस-बॉर्डर इनवर्ड बिल पेमेंट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
आता अनिवासी भारतीय (NRIs) भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) प्लॅटफॉर्मचा वापर करून मुसंदम एक्सचेंज (Musandam Exchange) द्वारे त्यांच्या कुटुंबियांची (भारतातील) बिल भरू शकतात.
भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारे इनबाउंड क्रॉस-बॉर्डर बिल पेमेंट देणारी कॅनरा बँक ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
ओमानमधील मुसंदम एक्सचेंज हे पहिले एक्सचेंज हाऊस आहे; जे क्रॉस-बॉर्डर इनकमिंग बिल पेमेंट्स सेवा लाँच करणार आहे. ते कॅनरा बँकेद्वारे चालवले जाते.
कुवेतमध्ये क्रॉस-बॉर्डर बिल पेमेंट सेवा आधीपासूनच कार्यरत आहे; जे वीज, पाणी, सेल फोन आणि गॅस बिले भरण्यासाठी उपयोगात आणले जाते.
ओमानमधील अनिवासी भारतीय आता प्रथमच या फायद्यांचा आनंद घेतील; जो भारताच्या डिजिटल पेमेंट प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.