भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ह्यांना 'सेंट्रल बँकिंग' या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन पत्रिका (जर्नल) द्वारे २०२३ चा 'गव्हर्नर ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
भारतीय केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरला हा पुरस्कार मिळाल्याची ही दुसरी वेळ आहे; रघुराम राजन ह्यांना २०१५ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
कोरोना महामारीच्या काळात आर.बी.आय. मध्ये शक्तिकांत दास ह्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पेमेंट सिस्टीम आणि विकासाभिमुख उपाय लागू करण्यात आले. त्याचप्रमाणे रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आंतराष्ट्रीय दबाव काळात भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहण्याच्या दृष्टीने शक्तिकांत दास यांनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली होती.
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध काळातील आंतरराष्ट्रीय दबावात देखील बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट (नेतृत्व) कामगिरीची दखल जगभरातून घेण्यात आली.
त्यामुळे 'सेंट्रल बँकिंग' कडून २०२३ चा 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्कार शक्तिकांत दास ह्यांना देण्यात आला.