प्रत्येक मराठी माणसाने श्रीमंत होण्याचा विचार करावा अशा हेतूने आम्ही प्रत्येक व्यक्तीची गरज ओळखून सल्ला देतो. आम्हाला स्वतःला आर्थिक सल्ला हवा होता तेव्हा या प्रकारच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. गेली दोन दशके आम्ही विविध व्यवसाय यशस्वीपणे केले. ते अजूनही जोमाने सुरू आहेत. शेअर मार्केटचा, म्युच्युअल फंडांचा अभ्यास केला, त्यात गुंतवणूक केली, पैसे कमावले. या अनुभवाचा फायदा इतर मराठी समाजाला द्यावा असा हेतू आहे.
आमच्याकडे आर्थिक क्षेत्रातील इतरही तज्ज्ञ व्यक्ती आहेत. ज्या विविध प्रसार माध्यमातून देखील गुंतवणूक समुपदेशन देतात. उत्तम कार्यालय आहे, जिथे सगळ्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे येणारी, आमच्याशी संपर्क साधणारी प्रत्येक व्यक्ती आधी आर्थिक साक्षर व्हावी. गुंतवणूक म्हणजे काय हे त्या व्यक्तीने नीट समजून घ्यावे आणि मगच आपला मेहनतीचा पैसा गुंतवावा असा आमचा आग्रह असतो. योग्य व्यक्तींकडून ज्ञान प्राप्त झाल्यास भविष्य सुखकर होणार; हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवाणीची गरज नसते.
आम्ही ध्यानीmoney.com या वेबसाइटद्वारे आर्थिक क्षेत्रातील रोजच्या घडामोडी, आर्थिक साक्षरता वाढविणारे लेख, विविध क्षेत्रात यश मिळविलेल्याच्या यशोगाथा, शेअर बाजारातील चढ उतारांची माहिती, गुंतवणूक पर्याय इत्यादी विनामूल्य देतो. गुंतवणूकदार केवळ पैशाने होत नाही, त्यासाठी एक प्रकारची मानसिकता हवी असते, त्यासाठी आम्ही मानसशास्त्रीय लेखही देतो. आर्थिक बाबतीत अनेकांचा भरवसा ग्रह-नक्षत्रांवरही असतो. त्यामुळे त्याबाबत आर्थिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याचाही प्रयत्न आम्ही करतो. यासोबत आर्थिक विचार रुजण्यासाठी आर्थिक विषयावर विविध स्पर्धा, कार्यक्रम देखील आयोजित करतो.
आम्ही कोण? ह्याच खरं उत्तर….. आपली आर्थिक प्रगती हेच आहे. आमचे मुख्य कामही तेच आहे.