उद्योगाला देखील जैव शास्त्राचे नियम लागू होतात. इंग्रजीत सुद्धा उद्योगाला 'एन्टिटी ' म्हणतात, म्हणजे एक जीवित गोष्ट. आपल्यासारखा उद्योगदेखील जन्म - बाल्य - किशोरावस्था- यौवन- जरावस्था- मरण याच चक्रातून जातो. आपल्याला जसं यौवनावस्थेपर्यंत वाढ होण्यासाठी पोषकद्रव्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे उद्योगालादेखील वाढीसाठी मनुष्यबळ आणि पैसा या दोन रिसोर्सेस ची सतत गरज असते. यात योग्य मनुष्यबळ मिळण्यासाठी देखील पैशांचीच गरज असते. म्हणजे पैसा हीच उद्योग वाढीसाठी अतीव आवश्यक अशी गोष्ट आहे. योग्य वेळी आणि योग्य किमतीत उपलब्ध होणारा पैसा हेच उद्योगाच्या यशाचे खरे गमक आहे.
मागच्या वाक्यातील 'योग्य किंमत'ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. उद्योगासाठी पैसा दोन मार्गांनी उपलब्ध होऊ शकतो.
१. कर्ज- पैसे उभे करण्याचा हा पर्याय त्यातल्यात्यात स्वस्त असा आहे. मात्र यात परतफेड आणि तीही व्याजासकट अपेक्षित असते. उद्योगाच्या गरजेप्रमाणे शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म लोन घेऊन पैशांची गरज भागवता येते.ज्या उद्योगांनी आता छान बाळसे धरले आहे, म्हणजेच ज्यांचा कॅश फ्लो व्यवस्थित आहे त्यांनी कर्जाऊ पैसे उभे करायला अजिबात हरकत नाही. पण ज्यांच्या उद्योगाची नुकतीच सुरुवात आहे किंवा कर्ज घेण्याच्या लिमिट्स संपल्या आहेत अशा वेळी मात्र इक्विटी च्या मार्गानेच पैसे उभे केले जाऊ शकतात.
२. इक्विटी- पैसे उभे करण्याचा हा सर्वात महागडा, पण वर म्हटल्याप्रमाणे काही केसेस मध्ये एकमेव उपलब्ध मार्ग. यात प्रमोटर सोबत गुंतवणूकदार देखील रिस्क उचलत असतात. त्यांचे पैसे बुडू देखील शकतात. म्हणून त्यांना देखील चांगला परतावा अपेक्षित असतो. हल्ली शार्क टॅंक सारख्या रिऍलिटी शो मुळे स्टार्ट अप फंडिंग बद्दल जनमानसात एक उत्सुकता तयार झाली आहे. बरेच HNI आणि UHNI म्हणजे साध्या आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोक आता या प्रकारात रस घेऊ लागलेत. पण यात देखील त्यांना योग्य ते स्टार्ट अप निवडण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
आपण कर्ज आणि इक्विटी अशा दोन्ही प्रकारे पैसे उभे करण्यासाठी उद्योगांना साहाय्य करतो. तुमच्या उद्योगाला पैशांची आवश्यकता आहे का? किंवा तुम्हाला अशा स्टार्ट अप्स मध्ये पैसे गुंतवायचे आहेत का? आमच्याशी जरूर संपर्क साधा.