फायनान्शिअल प्लॅनिंग


pageheaderimg


आर्थिक नियोजनाची सुत्रे
आर्थिक नियोजन ही व्यापक स्वरूपातील आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे एखादी व्यक्ती सर्व
आर्थिक गरजांचे नियोजन करून आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आर्थिक दृष्ट्या सक्षम होते. आर्थिक नियोजन
करताना पूर्ण कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक गरजा ग्राह्य धरल्या जातात. कारण दर पाच ते दहा वर्षात पूर्ण
कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजा बदलत असतात. त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत
महत्त्वाचे असते.
पती-पत्नी आणि दोन लहान मुलं असणारे छोटे कुटुंब जरी डोळ्यासमोर आणले तरी लक्षात येईल की, काही
वर्षांनंतर मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न खर्च येणारच आहेत. त्याचसोबत पती-पत्नी ला देखील भविष्यात
पेंशन स्वरूपात दरमहा पक्की रक्कम हाती येण्याची आवश्यकता भासते. थोडक्यात, पुढील दहा ते वीस वर्षांत
लागणाऱ्या पैशांची सोय करण्यासाठी आर्थिक नियोजनाची सुरुवात आत्ता पासून करण्याची गरज असते.

आर्थिक नियोजन बाबत एक सूत्र नेहमी लक्षात ठेवावे. दीर्घकाळ गुंतवणूक पर्याय निवडल्यास वर्तमान काळात
गुंतवणूक करताना आर्थिक ओझे वाटत नाही. उदाहरणार्थ, तीस वर्षाच्या व्यक्तीने हमी परतावा देणारा दहा
लाखांचा विमा पंचवीस वर्षांसाठी घेतल्यास अंदाजे चार हजार विमा हप्ता भरावा लागेल. आणि मुख्य म्हणजे
पंचवीस वर्षांचे विमा संरक्षण मिळण्यासाठी पूर्ण पंचवीस वर्षे विमा हप्ता भरावा लागत नाही. भारतातील अग्रगण्य
विमा कंपन्यांनी पंचवीस वर्षे विमा संरक्षणासाठी विमा हप्ता कालावधी सोळा वर्षे केला आहे. त्याबदल्यात
विमाधारकाला पंचवीस वर्षे दहा लाखांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास
अतिरिक्त दहा लाख आर्थिक संरक्षण आणि विमा कालावधी पूर्ण होईपर्यंत विमाधारक जिवंत राहिल्यास अंदाजे
पंचवीस लाख हुन अधिक हमी परतावा मिळतो.
वरील उदाहरणात एकच गुंतवणूक स्वरूपातील विमा पर्याय द्वारे कित्येक आर्थिक जोखमींची शक्यता संरक्षित
झाली. तर विचार करा.. तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक विवंचना हा शब्द तुमच्या
मनात देखील येणार नाही.
आर्थिक नियोजन एकच गुंतवणूक पर्याय निवडून पूर्ण होत नाही. सतत बदलणाऱ्या आर्थिक वातावरणात व्यक्तीचे
गुंतवणूक ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी खंडाखंडाने गुंतवणूक पर्याय निवडावे लागतात. कारण गुंतवणूक करण्यासाठी
उपलब्ध असलेला प्रत्येक पर्यायाचा परतावा आणि उद्देश पूर्ती विविध धोक्यांच्या तीव्रतेवर देखील अवलंबून
असते. अगदी साधे उदाहरण सांगायचे झाल्यास बँक मुदत ठेव वरील व्याजदर कमी-अधिक होताना आपण नेहमी
पाहत असतो. त्यामुळे आर्थिक नियोजन महत्व समजून घेण्यासाठी विविध जोखमींचा आढावा घेणे गरजेचे आहे.
खाली नमूद केलेल्या जोखमींचा परिणाम
निश्चित परतावा देणारे आणि अनिश्चित (कमी-अधिक)
परतावा देणारे गुंतवणूक पर्यायांवर होत असतो.
आर्थिक वातावरणातील जोखमी -

१. व्याजदर जोखीम - निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीवरील व्याज दर वाढल्यास शेअर बाजारातील
गुंतवणूकीवर विपरीत परिणाम करतो.
२. महागाई दर वाढ - महागाई दर वाढत राहिल्यास आपल्या गुंतवणुकीवरील परतावा कमी पडतो. म्हणजेच
आपले पैसे वाढत नाहीत.
३. शेअर बाजारातील तीव्र स्वरूपातील अनिश्चितता -
आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा दोन देशातील युद्ध थेट शेअर बाजारावर विपरीत परिणाम करतात. ही जोखीम
कोणीही कमी करू शकत नाही.
४. विनिमय (एक्सचेंज) दर जोखीम -

परदेशी चलनाची मूल्य वाढ आपली परदेशातील खरेदीवर थेट विपरीत परिणाम करते.
५. राजकीय अस्थिरता जोखीम -
राजकीय अस्थिरता असल्यास व्यवसाय क्षेत्रात उन्नती होणारी धोरणे राबविली जात नाहीत. ह्याचा थेट विपरीत
परिणाम गुंतवणूकदारांना सुद्धा होतो.
६. मंदीचा काळ -
प्रत्येक व्यवसाय क्षेत्रात चढ-उतार येत असतात. हा काळ अंदाजे एक वर्ष ते पाच वर्ष असू शकतो. मंदीच्या
काळात व्यवसायिक आणि गुंतवणूकदार दोघांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते.
आर्थिक नियोजन करताना सर्टिफाइड फाइनेंशियल प्लानर कडून सल्ला जरूर घ्यावा. पैशाची रूप अनेक प्रकारात
असतात. आपल्या भविष्यातील गरजांनुसार ते
बदलत राहते.
गुंतवणूकदारांच्या गरजा किंवा गुंतवणूक उद्देश -
● संपत्ती निर्माण करणे
● अखंड पैशाचा स्त्रोत निर्माण करणे
● कमर्शिअल प्रॉपर्टी घेणे
● कर बचत आणि कर व्यवस्थापन करणे
● भविष्य निर्वाह निधी जमविणे

गुंतवणूक उद्देश साध्य करण्यासाठी विविध गुंतवणूक पर्याय (फाइनेंशियल प्रॉडक्ट्स) -
● शेअर्स मध्ये थेट गुंतवणूक
● घर किंवा जमीन विकत घेणे
● पेन्शन प्लान
● म्यूचुअल फंड
● नॉन कन्वर्टिबल डिबेंचर
● बँक मुदत ठेव
● एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी (हमी परतावा देणारी)
● टर्म इन्शुरन्स पॉलिसी
● एक्सचेंज ट्रेडेड फंड
● यूनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान

प्रत्येकाच्या गरजेनुसार गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले तरी योग्य वेळेस आणि योग्य सल्ला घेऊन आर्थिक
नियोजन केल्यास पूर्ण कुटुंब सुरक्षित होते. पन्नाशी वरील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून एक वाक्य जरूर ऐकायला
भेटते; पन्नाशी कधी उलटून गेली समजलेच नाही. त्यामुळे वेळ न दवडता आर्थिक नियोजन बाबत पावले शक्य
तितक्या लवकर उचलणे हिताचे असते.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen