वारसा व्यवस्थापन


pageheaderimg


'डिमॅट अकाउंट नी गाठला विक्रमी टप्पा' ....

'मासिक सिप रक्कम दहा हजार कोटींच्या वर' ......

बातम्या वाचून श्रीपतरावांनी हलकेच हसत पेपर खाली ठेवला  डोकं मागे खुर्चीवर टेकवल आणि  डोळे मिटून ते भूतकाळात गेले. त्यांच्या डोळ्यासमोरून  २० वर्षांपूर्वीचा काळ सरकला. चांगली बॅंकेतली नोकरी सोडून त्यांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून पूर्णवेळ काम सुरु केलं तेव्हा आजूबाजूचे सगळेच मनातून धास्तावले होते. 'कसं होणार यांचं?' 'का अशी बुद्धी झाली असेल?' पण सरिताबाईंची त्यांना भक्कम साथ होती. सुरुवातीला पोस्ट ऑफिस स्कीम्स, बँकेच्या एफडी वगैरे गुंतवणूक साधनं सुचवता सुचवता ते हळूहळू mutual फंडांच्या विविध स्कीम्स आपल्या क्लायंट्स ना सुचवू लागले. पण क्लायंट लोकांचा शेअर मार्केटवर इतका गाढ अविश्वास की त्यांना समजावता समजावता श्रीपतरावांच्या नाकीनऊ यायचे. मग त्यातले काही 'धाडसी' क्लायंट्स तयार व्हायचे. अशी टुकूटुकू सुरुवात झाली. आधी uti ही एकच कंपनी होती जी अशा स्कीम्स चालवायची. ती सरकारी होती त्यामुळे लोकांचा त्यावर विश्वस होता. पण जसं सरकारने private कंपन्यांना मुभा दिली तेव्हा hdfc, फ्रँकलिन  सारख्या कंपन्यांच्या पण विविध स्कीम्स मार्केट मध्ये येऊ लागल्या. सरकारी कंपन्या सोडून या कंपन्यांच्या स्कीम्स मध्ये पैसे गुंतवायला क्लायंट्स ना तयार करणे हे आता पुढचे आव्हान होते. श्रीपतरावांनी त्यावरही मात केली. शेअर मार्केट मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून मिळालेला फायदा एफडी आणि तत्सम गुंतवणूक साधनांपेक्षा खूप अधिक असल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या क्लायंट्स नी ओळखीतल्या इतर लोकांनाही श्रीपतरावांशी जोडून दिलं आणि मग श्रीपतरावांची गाडी सुसाट निघाली. ११९० च्या 'mutual फंड म्हणजे काय रे भाऊ?' पासून 'mutual फंड सही है' पर्यंतचा प्रवास आठवून त्यांना मनोमन बरं वाटलं. 'श्रम सार्थकी लागले' असं पुटपुटून ते उठले. पण उठता उठता एक गोष्ट त्यांना आठवली आणि ते पुन्हा खाली बसले. हीच गोष्ट त्यांना गेले काही महिने डाचत होती, बोचत होती. २०-२२ वर्षांच्या मेहनतीने आता त्यांच्याकडे छान कॉर्पस AUM अंतर्गत जमा झाला होता. त्यावर एक डिसेन्ट उत्पन्न त्यांना महिन्याला मिळत होतं. पण वयोपरत्वे त्यांना आता क्लायंट्स ना अटेंड करणं जमत नव्हतं. नवीन तंत्रज्ञान, नवीन फंड संकल्पना यांच्याशी जुळवून घेणं, क्लायंट्स ना सतत नवनवीन माहिती पुरवणं, त्यांच्या शंकांचे समाधान करणं हे तसं हेक्टीकच होतं . ते निभावलं सुद्धा असतं जर पुढची पिढी याच व्यवसायात येण्याची शक्यता असती. पण मुलं अमेरिकेला सेटल झाल्यामुळे आपल्यापासून दुरावले एवढ्या वरच आपलं नुकसान थांबलं नाही, आपल्या व्यवसायाचा हॅण्डओव्हर किंवा हल्लिच्या भाषेत business succession planning पण त्यामुळे अडकलं हे त्यांच्या ध्यानी यायला लागलं होतं. आत्ता जेव्हा त्यांचा ग्राहकांची छान संवाद होता तेव्हाच त्यांना कोणाकडे तरी सोपवणे महत्वाचे आहे हे त्यांना जाणवत होतं. कारण आपण क्लायंट्स ना त्यांच्या मनाजोगती सर्विस देऊ शकलो नाही तर ते दुसरा सल्लागार शोधणार हे उघडच होतं. मग आपणच जाणतेपणी त्यांना कोणाहाती सोपवलं तर? तर त्या क्लायंट्स चा तर नक्की फायदा होईल. पण मग आपल्या उत्पन्नाचे काय? एवढ्या मेहनतीने उभा केलेला हा व्यवसाय असाच कोणालातरी देऊन टाकणं सुद्धा त्यांना पटत नव्हतं. गोंधळ वाढत होता. पण वेळेत निर्णय करणं आवश्यक होतं. अशातच त्यांना त्यांच्या एका मित्राने Apricot Partners या कंपनीबद्दल सांगितलं. त्या मित्राने त्याचा पूर्ण इन्शुरन्स व्यवसाय या कंपनीकडे सोपवला होता. श्रीपतराव त्या मित्राशी फोनवर बोलले. कंपनी, त्यांचे व्यवसाय प्रपोझिशन याबद्दल जुजबी माहिती घेऊन ते सरळ त्यांना भेटायला गेले. आज श्रीपतराव त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समाधानी आहेत. Apricot Partners मार्फत  त्यांचा व्यवसाय नुसता 'सांभाळला' गेला नाही तर दुपटीने वाढला सुद्धा. खऱ्या अर्थाने त्यांचा 'वारसा' पुढे सुरु राहिला. 

आपणही श्रीपतराव आणि त्यांच्या मित्रासारख्या situation मध्ये असाल तर Apricot Partners कडे तुम्हाला ऑफर करण्यासारखे काय आहे याची नक्की चौकशी करा. तुमचाही वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवा...

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen