इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग


pageheaderimg


गुंतवणुक- का? कशी? केंव्हा?
गुंतवणूक बाबत सविस्तर माहिती समजून घेण्याआधी गुंतवणूक गरजेची का आहे? ह्याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे.
आपल्या घरात किंवा आपल्या पाकिटात जे पैसे आहेत; त्याला 'बचत' असे म्हणतात. आपल्या गरजेनुसार हे पैसे आपण
कधीही खर्च करू शकतो. पण हेच पैसे गुंतवणूक योजनेत भरल्यास आपले पैसे वाढतात. आपण बँक मधील बचत खात्यात
पैसे ठेवले तरी किमान २.५ टक्के व्याज मिळते. म्हणजेच पैशाने पैसा निर्माण करण्याची प्रक्रिया गुंतवणूकीद्वारे सुरु होते.
गुंतवणूक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काही ठराविक कालावधीच्या अंतराने खंडाखंडाने पैशाची गुंतवणूक करणे
गरजेचे असते. त्याचसोबत गुंतवणूक योजनेतील परतावा आणि इतर जोखमींचा देखील आढावा घ्यावा लागतो. कारण दर
पाच वर्षांनी व्यक्तीच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजा बदलत असतात.
गुंतवणूक नियोजन ही आपल्या पैशाचे व्यवस्थापन करण्याची पहिली पायरी असते. 'पैशाने पैसा वाढतो' हे साधे सूत्र
लक्षात ठेवल्यास आपल्याला जाणवेल की, वर्तमान काळात केलेले पैशाचे योग्य नियोजन भविष्य सुखकर करते.
कुठलीही क्रिया प्रत्यक्षात करण्यापूर्वी मनात घटनाक्रम तयार होत असतो. साधे बँक मध्ये जाऊन नवीन खाते उघडायचे
असल्यास कित्येक गोष्टींचा पाठपुरावा मनात आधीपासून सुरू झालेला असतो. बँक बचत खात्यात किमान किती रक्कम
ठेवावी लागेल, चेकबुक हवं असल्यास किती अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल, दर सहा महिन्याला बँक एसएमेस सेवा शुल्क
आकारणी इत्यादी. त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक योजनेबाबत विश्लेषण सुरू होते. त्यामध्ये गुंतवणूक
योजने सोबत जोडलेली जोखीम आणि गुंतवणूक परतावा बाबत अभ्यास सुरू होतो. उदारणार्थ, कर बचत करणाऱ्या बँक
मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) मध्ये पैसे ठेवल्यास ठराविक मुदत पूर्ण होईपर्यंत पैसे काढून घेता येत नाहीत.
बाजारात अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत; पण प्रत्येक गुंतवणूक योजना आपल्यासाठी नाही. एखाद्या व्यक्तीचा
स्वभाव खर्चिक असल्यास दरमहा ठराविक रक्कम बँक बचत खात्यात जाणाऱ्या योजनेचा पर्याय त्या व्यक्तीस उपयोगी
पडणार नाही.
अशा व्यक्तीने एकरकमी भरलेली रक्कम ठराविक कालावधीनंतर दुप्पट होण्याऱ्या सरकारी गुंतवणूक योजनेत करावी;
किंवा एकरकमी पैसे भरून आयुर्विमा संरक्षण घ्यावे.

गुंतवणूक नियोजन करताना दोन बाजू स्पष्ट असाव्या लागतात.
१. गुंतवणूक पर्यायाचे योग्य विश्लेषण -
प्रत्येक गुंतवणूक पर्याय आपली गरज पूर्ण करू शकत नाही. म्हणून योग्य पर्याय निवडताना खाली नमूद केलेले मुद्दे
नक्की पडताळून पहावेत. जेणेकरून आपले गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
● गुंतवणूक योजनेचे स्वरूप

● गुंतवणूक योजनेचे खास वैशिष्ट्ये किंवा वेगळेपण
● गुंतवणूक कालावधी
● गुंतवणुकीतून मिळणारा परतावा
● गुंतवणूक सोबत असलेली जोखीम

येथे 'जोखीम' ह्या शब्दाचा अर्थ 'गुंतवणूक रक्कम' आणि 'निश्चित परतावा' न मिळण्याबाबत केलेला नाही. कारण आपले
पैसे नेहमी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा भारतीय रिजर्व बँक आणि सेबी सारख्या नियामक मंडळाच्या कक्षेत
येणाऱ्या अधिकृत गुंतवणूक पर्यायात असले पाहिजेत. कायदा सतर्क व्यक्तीस मदत करतो. आपण अधिक परतावा
मिळण्याचा लोभ मनात धरून स्वतःहुन अनधिकृत भिशी योजना किंवा सोने दुकानदाराकडील भिशी योजनेत पैशाची
गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याची शक्यता शंभर टक्के आहे.
२. पोर्टफोलिओ व्यवस्थापन -
पोर्टफोलिओ म्हणजे विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कंपन्यांचे शेअर्स किंवा इतर कर्जरोखे
(डिबेंचर, प्रेफरन्स शेअर्स, बॉण्ड इत्यादी) मध्ये गुंतवणूक करणे; जेणेकरून जोखीम स्तर कमी होऊन परतावा अधिक
मिळण्याची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीने फक्त शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास नफा किंवा तोटा होऊ शकतो.
कारण शेअर बाजार मधून मिळणारा परतावा अनिश्चित आहे. विविध स्वरूपातील धोके थेट शेअर बाजारावर प्रभाव टाकत
असतात. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध पैशाचे योग्य नियोजन करून पोर्टफोलिओ तयार केला जातो.

ह्या दोन बाजू स्पष्ट असल्यास आपण गुंतवणूक नियोजन योग्य पद्धतीत होते. काही गुंतवणूक नियोजन करण्याची
मार्गदर्शक तत्वे थोडक्यात पाहू.
१. गरजेनुसार गुंतवणूक पर्याय निवडावा.
२. गुंतवणूक करण्यात नेहमी सातत्य ठेवावे.
३. पूर्ण कुटूंबाची गरज ओळखून गुंतवणूक करावी.
४. एकच फायदा केंद्रीभूत ठेवून गुंतवणूक करू नये.
(उदाहरणार्थ, कर बचत करण्यासाठी केलेली
गुंतवणूक)
५. गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी.
६. गुंतवणूक सल्लागाराकडून किमान दोन

गुंतवणूक पर्याय घ्यावे.
७. गुंतवणूक सल्लागाराकडून मिळालेल्या गुंतवणूक
पर्यायांची मित्र मंडळी सोबत चर्चा करणे टाळावे.
८. आपल्या पुढील पिढीचा म्हणजेच मुलांच्या उज्वल भविष्याचा विचार करून दीर्घ मुदतीचा गुंतवणूक पर्याय निवडावा.
थोडक्यात, गुंतवणुकीत सातत्य अधिक महत्त्वाचे असते. हे साध्य झाल्यास गुंतवणूकदाराची भविष्यातील उद्दिष्टे साध्य
होण्यास मदत होते.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen