सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.
मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या बँक किंवा पोस्ट खात्याला सुकन्या समृद्धी योजना असे म्हणतात.
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त १५ वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील 15 ते २१ वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत ३५.२७ टक्के तुमची गुंतवणूक असते आणि ६४.७३ टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळू शकता.
नवीन अपडेट
आधी एका परिवारातील फक्त २ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
विशेष सूचना: आम्ही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबे असतील जे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर