ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सिनिअर सिटीझन सेविंग स्कीम-एस.सी.एस.एस.) ही भारतातील ६० वय पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी नियमित उत्पन्न मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आली. देशभरातील प्रमाणित बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये ह्या योजने अंतर्गत खाते उघडण्याची सोय उपलब्ध आहे
योजनेचे काही मुख्य फायदे आहेत:
- उच्च व्याज दर (सध्या ८.००% व्याजदर आहे)
- कर कपात लाभ
(अंतर्गत आयकर कायदा, १९६१ च्या कलम
८०क अंतर्गत, व्यक्ती रु. 1.5 लाखांपर्यंतच्या
गुंतवणुकीवर कर कपातीसाठी पात्र आहेत.)
- योजनेत नमूद केलेल्या अटी नुसार अकाली पैसे काढण्याची परवानगी
- खाते देशभरात हस्तांतरित केले जाऊ शकते
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडण्याची प्रक्रिया
- जवळच्या बँक शाखेला किंवा पोस्ट ऑफिस ला भेट द्या.
- केवायसी कागदपत्रांसह अर्ज करावा.
- जमा केलेल्या रकमेचा धनादेश (चेक) देणे आवश्यक आहे.
- खात्यात नॉमिनी चे नाव नमूद करावे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना पात्रता
- ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे.
- ज्या व्यक्तींचे वय ५५ वर्षे पूर्ण झाले आहे; परंतु ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे असताना सेवानिवृत्ती घेतलेली व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडण्यास पात्र आहेत.
- अनिवासी भारतीय (NRIs) आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (एच.यु.एफ.) एस.सी.एस.एस. खाते उघडण्यास पात्र नाहीत.
सध्या एस.सी.एस.एस व्याज दर ८.००% आहे. बचत आणि मुदत ठेव (FD) खात्यांच्या तुलनेत
एस.सी.एस.एस व्याज दर नेहमी अधिक असतो.
एस.सी.एस.एस ठेविदाराला तीन महिन्याच्या अंतराने व्याज दिले जाते.
व्याज देय दिवस - 31 मार्च, 30 जून, 30सप्टेंबर आणि 31 डिसेंबर
(आपण कुठल्याही तारखेस गुंतवणूक सुरू केली असली तरी व्याज वर नमूद केलेल्या दिवशी गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतात.)
एस.सी.एस.एस वैशिष्ट्ये
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहेत:
१.योजनेची परिपक्वता: योजनेचा परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे. पण व्यक्ती ५वर्षे पूर्ण होण्याआधी ३ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी वाढवू शकतो.
२. नामांकन: खाते उघडण्याच्या वेळी किंवा खाते उघडल्यानंतर नामांकन (नॉमिनी) केले जाऊ शकते.
३. खात्यांची संख्या: व्यक्तींना एकापेक्षा जास्त खाती स्वतः चालवण्याची किंवा त्यांच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडण्याची परवानगी आहे. संयुक्त खाती केवळ जोडीदारासह उघडली जाऊ शकतात.
पण ज्याचे नाव पाहिले नमूद केले जाते; ती व्यक्ती
संयुक्त खात्यात प्रथम ठेवीदार गणली जाते.
४. किमान आणि कमाल रक्कम:
या योजने अंतर्गत वरिष्ठ नागरिक १५ लाख पर्यंत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करण्याची रक्कम
उदाहरण- वरिष्ठ व्यक्ती
५. मुदतपूर्व पैसे काढणे: खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर, मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे. तथापि, १ वर्ष आणि २ वर्षानंतर मुदतपूर्व पैसे काढल्यास जमा केलेल्या एकूण रकमेचे १.५% शुल्क आणि १% शुल्क आकारले जाईल.