महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC)


pageheaderimg


महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट(MSSC)

MSSC : केंद्र सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे-तोटे कोणते? व्याज करमुक्त आहे का?

Mahila Samman Savings Certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Saving Certificate-MSSC) ही नवीन योजना जाहीर केली होती.

Mahila Samman Saving Certificate-MSSC : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Saving Certificate-MSSC) ही नवीन योजना जाहीर केली होती. 1 एप्रिलपासून ही योजना सुरू झाली असून आता महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महिला सन्मान बचत पत्र योजना महिलांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते. त्याविषयी जाणून घेऊ या.

एमएसएससी योजना काय आहे?
महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक वेळची गुंतवणूक योजना आहे. मात्र त्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे ही योजना आकर्षक झाली आहे. एमएसएससीमध्ये महिलांना 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. ही योजना मुदत ठेव योजनेसारखी आहे. कोणत्याही वयाच्या मुली किंवा महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा केवळ 2 लाख आहे.

पोस्ट ऑफिस मुदत ठेवी (FD) पेक्षा चांगला पर्याय
सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के दराने व्याज मिळत आहे. तर दोन वर्षांच्या एफडीवर 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत महिला सन्मान बचत पत्र योजना ही अधिक फायदेशीर गुंतवणूक आहे. ज्यामध्ये दोन वर्षांत 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. याशिवाय दुसरा फायदा असा आहे की, तुम्हाला मुदत ठेवीमध्ये अंशतः पैसे काढण्याची सुविधा मिळत नाही, परंतु महिलांना महिला सन्मान बचत पत्रात हा पर्याय मिळेल.

योजनेचे तोटे
एमएसएससीच्या फायद्यांसोबतच काही तोटे देखील आहेत, जसे की- या योजनेतील व्याज चांगले आहे, परंतु गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय ही दोन वर्षांची बचत योजना असेल, ज्याचा लाभ 2025 पर्यंत घेता येईल. परंतु या योजनेवर मिळणारे व्याज करमुक्त असेल की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.


*महिला सन्मान प्रमाणपत्र उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही लहान बचत योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*

1)खाते उघडण्याचा फॉर्म
2)केवायसी फॉर्म (नवीन ग्राहक/केवायसी तपशीलांमध्ये बदल          करण्यासाठी))
3)पॅन कार्ड
4)आधार कार्ड, आधार उपलब्ध न केल्यास खालील कागदपत्र सादर केले जाऊ शकतात.1.पासपोर्ट 2.ड्रायव्हिंग लायसन्स 3. मतदार ओळखपत्र 4. मनरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड 5. नाव आणि पत्त्याचा तपशील असलेले राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरने जारी केलेले पत्र.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen