ट्रेडिंग आयडिया


pageheaderimg


जागतिक स्तरावर गुंतवणूक विषयावर संशोधन करणाऱ्या अनेक दिग्गज संस्थांचे अहवाल सांगतात की, 'भारतीय व्यक्ती पैसे बचत करण्यात अग्रेसर असतो; पण गुंतवणूक करताना अनेकदा चूक करतो'.

 

अनेक व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणूक विषयावरील कार्यक्रम पाहतात किंवा लेख वाचत असतात; पण नेमकी सुरुवात कुठून व कशी करावी हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून शेअर्स मधील कमी कालावधीसाठी  गुंतवणूक (किंवा दीर्घकाळ गुंतवणूक) करताना खालील नमूद केलेल्या नियमांचे पालन कटाक्षाने करावे.

 

 

■ पहिले एक वर्ष शेअर्स मधील इंट्रा-डे ट्रेडिंग टाळावे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पैशाने शेअर्स विकत घ्यावे. जेणेकरून मार्केट मधील चढउताराचा अंदाज पैसे न गमावता घेता येईल.

 

■ सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सहभाग घेणाऱ्या कंपनीचे शेअर्स घ्यावे.

 

■ सुरुवातीच्या काळात शेअर्समधील गुंतवणूक बँकेमधील मुदत ठेवीवरील मिळणाऱ्या व्याजाने करावी. कारण बाजारातील चढ-उतार पेलण्यासाठी दरमहा येणारी निश्चित रक्कम खूप महत्त्वाची असते.

 

■ दर महिन्यात किंवा तिमाहीत थोडे-थोडे करून शेअर्स घ्यावेत.

 

■ एकाचवेळी दोन पेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स घेऊ नये. कारण शेअर्स चे भाव खाली आल्यास अधिक शेअर्स घेण्यास पैसे शिल्लक उरत नाहीत.

 

■ शेअर बाजारात सलग एक-दोन आठवडे वाढ होत असल्यास आपल्याकडील १० टक्के ते २५ टक्के शेअर्स विकून टाकावेत. जेणेकरून मार्केट खाली आल्यावर त्याच कंपनीचे शेअर्स कमी भावात विकत घेता येतील.

 

■ दररोज इंट्रा-डे ट्रेडिंग करणे टाळावे. कारण व्यक्तीची वृत्ती जुगारी होते.

 

■ शेअर्स ही इलेक्ट्रॉनिक मालमत्ता आहे. तुम्हाला खंडाखंडाने शेअर्स घेऊन मालमत्ता निर्माण करायची आहे, हे कधीही विसरू नका

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen