गुंतवणूक दृष्टीने चांगले म्युच्युअल फंड


pageheaderimg


Scheme Name 3Years  5 Years 10 Years Since Inception
Nippon India Small Cap Fund 31.11% 24.68% 22.31% 22.19%
Kotak Samll Cap Fund 24.99% 22.65% 18.85% 14.98%

 

म्युच्युअल फंड योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास

भारतातील नागरिकांनी अधिक पसंती दर्शविली आहे.  २०२२ पर्यंत गुंतवणूकदारांकडून ११ करोड डिमॅट खाते आणि ६ करोड हुन अधिक म्युच्युअल फंड खाते उघडली गेली आहेत. भारतीय शेअर बाजारात ह्याला तिसरी महाशक्ती म्हणून संबोधले जात आहे. कारण सुध्दा तेव्हढेच मजबूत आहे. आज म्युच्युअल फंड मधील एस.आय.पी. पद्धतीने दरमहा १३ हजार करोड पेक्षा अधिक पैसे एकत्र होत आहेत. ह्या पैशातून शेअर बाजारातील रोखे आणि कर्जरोखे खरेदी केले जात आहेत.

 

पूर्वी भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून (एफ.आय.आय)  विक्री दबाव आल्यास शेअर बाजार खाली यायचे. पण आज भारतीय गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक नवीन उच्चांक गाठत आहेत. ह्याचे सर्वात मोठे श्रेय म्युच्युअल फंड योजनांकडे जाते.

 

पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की, दीर्घकाळ  गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने योग्य म्युच्युअल फंड

कोणते? ह्याचे उत्तर देण्यापूर्वी म्युच्युअल फंड (योजना)

बद्दल स्पष्टता असण्याची गरज आहे. ते मुद्दे पुढीलप्रमाणे -

 

  • म्युच्युअल फंड कंपनीच्या अनेक म्युच्युअल फंड (गुंतवणूक) योजना असतात.
  • म्युच्युअल फंड योजनेचे नाव गुंतवणूक स्वरूप लक्षात आणते.

उदाहरण- एखाद्या म्युच्युअल फंड योजने चे नाव 'इक्विटी टॉप २००' असल्यास म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे पैसे स्टॉक एक्सचेंज मधील 'टॉप २०० निर्देशांक' मधील दोनशे कंपन्यांचे शेअर्स खरेदीस उपयोगात आणले जातात.

  • एखादी म्युच्युअल फंड योजना दरवर्षी पहिल्या पाच उत्तम परतावा देणाऱ्या यादीत येत नाही.
  • मोठ्या किंमतीचे शेअर्स सामान्य व्यक्ती घेऊ शकत नाही. म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशातून मोठ्या किंमतीचे शेअर्स विकत घेऊन त्याचा फायदा

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना करून देते.

 

चांगले म्युच्युअल फंड (म्युच्युअल फंड योजना) निवडण्याचे मापदंड -

 

  • आपला परतावा (रिटर्न) मोजण्यासाठी म्युच्युअल फंड (योजना) ज्या निर्देशांक सोबत तुलना करत असेल; तो निर्देशांक सोबतचा मागील ५ वर्षांचा तुलनात्मक परतावा पाहणे.

 

  • म्युच्युअल फंड योजनेचे परतावा मिळण्याचे सातत्य पहावे. त्यातून म्युच्युअल फंड मॅनेजर चे गुंतवणूक कौशल्य (प्रथमदर्शनी) समजते.

 

  • म्युच्युअल फंड मॅनेजर ची मागील ५-१० वर्षांतील आर्थिक क्षेत्रातील कामगिरी पडताळावी.

 

  • म्युच्युअल फंड कंपनीची मालमत्ता व्यवस्थापन समिती (Asset Management Committee) ची आर्थिक क्षेत्रातील कामगिरी पडताळावी.

 

  • म्युच्युअल फंड योजनेच्या व्यवस्थापनेत येणारी मालमत्ता (Asset Under Management) अधिक असल्यास म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे पैसे अधिक प्रमाणात असल्याचे दर्शविते.

 

  • म्युच्युअल फंड कंपनीचे गुंतवणूक संबंधित खर्चाचे प्रमाण पहावे. खर्च प्रमाण अधिक असल्यास गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळतो.

 

प्रत्येक म्युच्युअल फंड योजना काही विशिष्ट स्वरुपातील गुंतवणूकदारांसाठी असते. त्यामुळे म्युच्युअल फंड योजना निवडताना स्वतःचा गुंतवणूक कालावधी, गुंतवणूक उद्दिष्ट आणि आर्थिक परतावा संबंधित धोका पत्करण्याची मानसिक तयारी ठरवून म्युच्युअल फंड योजना निवडावी.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen