बहुतांश लोक निवासी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतात. कारण प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित करायचे असते. काही व्यक्ती भविष्यातील उत्पन्नाचा स्रोत स्वरूपात घर घेतात. घर भाड्याने देण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पण आजच्या काळात पेन्शन स्वरूपात पैसे मिळण्याच्या दृष्टीने घर घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही व्यक्ती वृद्धापकाळात बँकेकडे घर गहाण स्वरूपात (रिव्हर्स-मोर्डगेज) ठेवून दरमहा पैशाची सोय करण्याची योजना देखील आखतात.
पण जर आपले उद्दिष्ट स्पष्ट असल्यास प्रॉपर्टी गुंतवणूक पर्याय अनेक आहेत. सध्या कमर्शिअल रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याकडे अधिक आहे. कोरोना महामारी नंतर म्हणजेच २०२२ मध्ये कमर्शिअल रिअल इस्टेट प्रॉपर्टी मधील गुंतवणूक ३०% वाढली आहे.
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) आणि फ्रॅक्शनल ओनरशिप सारख्या पर्याय उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणूकदार कमर्शिअल रिअल इस्टेट प्रॉपर्टी खरेदी करण्यास अधिक सक्षम झाले आहेत.
कारण गुंतवणूकदारांना चांगल्या जागेतील (प्राईम लोकेशन) व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळते. त्याचसोबत मासिक भाड्याचा उत्पन्न स्रोत उपलब्ध होत आहे. भविष्यात रिअल इस्टेट प्रॉपर्टी विकल्यास अधिक आर्थिक लाभ होतो. त्यामुळे
कमर्शिअल रिअल इस्टेट प्रॉपर्टीकडे दीर्घकालीन संपत्ती सुरक्षित करण्याचा मार्ग म्हणून पाहिले जाते.