डेट


pageheaderimg


डेट फंड: खात्रीशीर परतावा गुंतवणूक पर्याय

 

डेट फंड म्हणजे काही ठराविक कालावधीसाठी कर्ज स्वरूपात गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे. प्रत्येक व्यक्तीला जशी पैशाची गरज असते; तशीच गरज कंपनी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार ला सुद्धा भासते. आपल्याला तात्पुरती पैशाची गरज भासल्यास आपण बँकेतून कर्ज घेतो. त्याचप्रमाणे कंपनी आणि सरकारला पैशाची गरज भासल्यास ते कर्जरोखे म्हणजेच डिबेंचर, बॉण्ड्स आणि इतर प्रकारचे कर्जरोखे जारी (इश्यू) करून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतात. त्याबदल्यात निश्चित परतावा देखील दिला जातो. बँक सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट द्वारे गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना निश्चित परतावा देते.

अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास खात्रीशीर पोचपावती दिल्याशिवाय कोण बरं पैसे देईल. कर्जरोखे जारी करणे म्हणजे डिबेंचर सर्टिफिकेट, बँक फिक्स्ड डिपॉझिट, बॉण्ड्स देऊन पैसे घेणे. हा कर्ज स्वरूपात पैसे घेतल्याचा पुरावाच असतो.

 

देशाची अर्थव्यवस्था योग्यरीत्या चालण्यासाठी पैसे सर्व क्षेत्रात फिरत राहणे गरजेचे असते. काही मूठभर लोकांकडेच सर्व पैसा राहिल्यास देशाचा विकास होऊ शकत नाही. कंपन्या, गरीब आणि मध्यमवर्गीय गटात कर्ज स्वरूपात पैसे पुरवले गेल्यास नवीन उद्योगांना चालना मिळते; प्रत्येक घरात आर्थिक उत्पन्न वाढते. म्हणजेच पैसा एकाच ठिकाणी तुंबून न राहता सगळीकडे पसरतो. ह्या पैशाची एक गंमत आहे. हा जितक्या वेळा फिरवू तितका तो वाढत जातो. आकाउंटिंग भाषेत त्याला 'कॅपिटल रोल आउट रेशो' असे म्हणतात.

एक उदाहरण द्वारे समजून घेऊ या. समजा एका कंपनीकडे कच्चा माल विकत घेण्यासाठी एक लाख रुपये आहेत. ह्या पैशातून कच्चा माल विकत घेऊन त्यांनी प्रॉडक्ट बनवले. ते विकून दहा टक्के नफा झाला. हे सर्व एक महिना कालावधीत झाले. तर पुन्हा त्यांच्याकडे एक लाख अधिक नफ्याचे दहा हजार आले. पण त्यांनी ठरवले की, प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयात प्रॉडक्ट बनवून विकायचे. तर पूर्ण वर्षात त्यांनी एक लाख रुपये बारा वेळा वापरले. आणि दरमहा दहा टक्के नफा प्रमाणे एक लाख वीस हजार मिळवले. आपण असे देखील बोलू शकतो; एक लाखातून त्यांनी पूर्ण वर्षभरात एक लाख वीस हजार कमावले. ही आहे पैसे फिरते राहण्याची ताकत.

हीच ताकत वेगवेगळ्या स्वरूपात कंपन्या आणि सरकार 'कर्जरोखे' जारी (इश्यू) करून वापरत असते. अधिक पैसे असणाऱ्यांकडून गुंतवणूक योजनेद्वारे पैसे घेऊन गरज असलेल्यांना कर्ज स्वरूपात पैसे पुरविल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. हे सर्व सांगण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेले पैसे निश्चित परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम आपण करत असतो.

 

आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. देशाच्या अर्थव्यवस्थेत (फायनान्शियल सिस्टीम मध्ये) बँक,

म्युच्युअल फंड कंपन्या आणि सरकार अधिकृत रित्या  वेगवेगळ्या निश्चित परतावा देणाऱ्या योजनांद्वारे पैसे एकत्रित करतात. त्या गुंतवणूक योजना आपल्यासाठी पैसे गुंतवणूक करण्याची संधीच असते. ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी निश्चित परतावा देणाऱ्या विविध योजना अभ्यासणे देखील गरजेचे असते. काही गुंतवणूक पर्यायात आपण थेट गुंतवणूक करू शकत नाहीत. पण म्युच्युअल फंड द्वारे आपल्या पैशांची  गुंतवणूक होते.

उदाहरण - कॉमर्शिअल पेपर, कॉल मनी, ट्रेजरी बिल इत्यादी.

 

सेबी द्वारे डेट म्युच्युअल फंड ची १६ प्रकारात विभागणी केली आहे. ते समजून घेण्याआधी काही शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.

 

* कर्जरोखे -

  • मुदतीनुसार कर्जरोखे चे वर्गीकरण दोन भागात होते. अल्प कालावधीचे कर्जरोखे

आणि दीर्घ कालावधीचे कर्जरोखे.

  • अल्प कालावधीचे कर्जरोखे मनी मार्केट मध्ये ट्रेड (खरेदी-विक्री) होतात.

मनी मार्केट मधील कर्जरोखे १ दिवस ते ३६४ कालावधीचे असतात.

  • दीर्घ कालावधीचे कर्जरोखे कॅपिटल मार्केट मध्ये ट्रेड होतात.

 

 

* मनी मार्केट -

  • ह्या मार्केट मध्ये एक वर्ष कालावधी पेक्षा कमी अवधीचे कर्जरोखे (मार्केट सिक्युरिटीज) ची खरेदी-विक्री (ट्रेड) होते.
  • मनी मार्केट मध्ये ट्रेड होणाऱ्या सिक्युरिटीज ना मनी मार्केट सिक्युरिटीज म्हणतात.
  • हे मार्केट पूर्णतः कॉम्प्युटर प्रणालीद्वारे चालते. म्हणजेच मनी मार्केट सिक्युरिटीज बाजारात आणणारे आणि विकत घेणारे दोन्ही पक्ष कॉम्प्युटर प्रणालीद्वारे जोडलेले असतात.

थोडक्यात, शेअर बाजार सारखे 'मनी मार्केट' चे ऑफिस किंवा इमारत अस्तित्वात नाही.

 

* मनी मार्केट सिक्युरिटीज -

  • मनी मार्केट मध्ये ट्रेड होणाऱ्या सिक्युरिटीज

(कर्जरोखे) जास्तीत जास्त ३६४ दिवस कालावधीसाठी असतात.

  • मनी मार्केट सिक्युरिटीज मध्ये ट्रेझरी बिल, कॉमर्शिअल पेपर, कॉल मनी इत्यादी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट येतात.
  • ह्या मार्केट मध्ये खरेदी-विक्री (ट्रेड) करणारे बँक, म्युच्युअल फंड, आणि इतर वित्तीय संस्था येतात.

 

* डेट म्युच्युअल फंड योजना -

  • डेट म्युच्युअल फंड योजनांद्वारे कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी कंपन्या, सरकारी बँका, खासगी बँका आदींचे हे कर्जरोखे असतात.
  • डेट फंड मधील गुंतवणूक अल्प कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी असते.

 

सेबी द्वारे डेट म्युच्युअल फंड ची १६ प्रकारात केलेली विभागणी

 

1. ओव्हर नाईट फंड -

ह्या प्रकारात येणारे म्युच्युअल फंड १ दिवस ते १२ दिवस मुदतीच्या कर्जरोखे मध्ये पैशाची गुंतवणूक करतात.

 

2. लिक्विड फंड -

ह्या प्रकारात येणारे म्युच्युअल फंड ९१ दिवस पर्यंत कालावधीच्या कर्जरोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीज (कर्जरोखे) मध्ये पैशाची गुंतवणूक करतात.

 

3. अल्ट्रा-शॉर्ट ड्युरेशन फंड -

ह्या प्रकारात येणारे म्युच्युअल फंड ३ महिने ते ६ महिने

कालावधीच्या विविध कर्जरोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीज (कर्जरोखे) मध्ये पैशाची गुंतवणूक करतात.

 

4. लो ड्युरेशन फंड -

ह्या प्रकारात येणारे म्युच्युअल फंड

६ महिने ते १२ महिने कालावधीच्या विविध कर्जरोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीज (कर्जरोखे) मध्ये पैशाची गुंतवणूक करतात.

 

5. मनी मार्केट फंड -

हे म्युच्युअल फंड मनी मार्केट मधील कर्जरोखे मध्ये गुंतवणूक करतात. ज्यांचा गुंतवणूक कालावधी एक वर्ष पेक्षा अधिक नसतो.

 

6. शॉर्ट ड्युरेशन फंड -

अल्प गुंतवणूक कालावधी अवलंबणाऱ्या म्युच्युअल फंड ची गुंतवणूक मनी मार्केट सिक्युरिटीज आणि ३ वर्ष ते ४ वर्ष कालावधीच्या कर्जरोखे मध्ये करण्यात येते.

 

७. मिडीयम ड्युरेशन फंड -

मध्यम गुंतवणूक कालावधी अवलंबणाऱ्या म्युच्युअल फंड ची गुंतवणूक मनी मार्केट सिक्युरिटीज आणि ३ वर्ष ते ४ वर्ष कालावधीच्या कर्जरोखे मध्ये करण्यात येते.

 

८. मिडियम टू लॉंग ड्युरेशन फंड -

मध्यम ते दीर्घ गुंतवणूक कालावधी अवलंबणाऱ्या म्युच्युअल फंड ची गुंतवणूक मनी मार्केट सिक्युरिटीज आणि ४ वर्ष ते ७ वर्ष कालावधीच्या कर्जरोखे मध्ये करण्यात येते.

 

९. लॉंग ड्युरेशन फंड

दीर्घ गुंतवणूक कालावधी अवलंबणाऱ्या म्युच्युअल फंड ची गुंतवणूक मनी मार्केट सिक्युरिटीज आणि ७ वर्षांहून अधिक कालावधीच्या कर्जरोखे मध्ये करण्यात येते.

 

१०. डायनॅमिक बॉण्ड -

डायनॅमिक बॉण्ड फंड ला विविध गुंतवणूक कालावधीचे बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड स्वरूपात ओळखले जाते.

 

११. कॉर्पोरेट बॉण्ड फंड -

कॉर्पोरेट बॉण्ड फंड AA+ श्रेणीत येणाऱ्या कॉर्पोरेट बॉण्ड मध्ये गुंतवणूक करतो. म्युच्युअल फंड कंपनीकडे

असलेल्या एकूण फंड पैकी ८०% गुंतवणूक कॉर्पोरेट बॉण्ड फंड मध्ये करण्यात येते.

 

१२. क्रेडिट रिस्क फंड -

क्रेडिट रिस्क फंड AA श्रेणीत येणाऱ्या कॉर्पोरेट बॉण्ड मध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड कंपनीकडे असलेल्या एकूण फंड पैकी ६५% गुंतवणूक कॉर्पोरेट बॉण्ड फंड मध्ये करण्यात येते.

 

१३. बँकिंग अँड पी.एस.यु फंड -

ह्या प्रकारात येणारे म्युच्युअल फंड बँक आणि इतर वित्तीय संस्थांचे बॉण्ड्स आणि म्युनिसिपल बॉण्ड्स मध्ये एकूण उपलब्ध फंड पैकी ८०% गुंतवणूक करतात.

 

१४. गिल्ट फंड -

गिल्ट फंड एकूण उपलब्ध फंड पैकी ८०% गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज (कर्जरोखे) मध्ये करतात.

 

१५. गिल्ट फंड: १० वर्षे मुदतीची गुंतवणूक करणारे -

ह्या प्रकारात येणारे गिल्ट फंड १० वर्षे मुदतीच्या

गव्हर्नमेंट सिक्युरिटीज (कर्जरोखे) मध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक एकूण उपलब्ध फंड च्या

८०% असते.

 

१६. फ्लोटर फंड -

फ्लोटर फंड हे कमी-अधिक परतावा (फ्लोटिंग रेट) होणाऱ्या कर्जरोखे मध्ये पैशाची गुंतवणूक करतात.

डेट मार्केट मधील गरजेनुसार कमी-अधिक परतावा देणाऱ्या कर्जरोखे मध्ये फ्लोटर फंड ची गुंतवणूक किमान ६५% असते.

 

 

डेट फंड बाबत गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे मुद्दे

-

. सेबी द्वारे नमूद केलेले सर्व प्रकारचे डेट फंड हे ओपन-एंन्डेड फंड आहेत.

ओपन-एंन्डेड फंड म्हणजे गुंतवणूकदार कधीही ह्या फंड मध्ये पैशाची गुंतवणूक करू शकतो. आणि पाहिजे तेव्हा पैसे काढून घेऊन शकतो.

 

२. डेट म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदाराला परतावा मिळतो. पण निश्चित रकमेचा परतावा मिळत नाही.

मार्केट मधील मंदीच्या काळात हा परतावा बँक मुदत ठेव योजनेवरील परताव्याहुन कमी असू शकतो.

 

३. म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यास इच्छुक व्यक्तीने किमान ५०% गुंतवणूक इक्विटी लिंक म्युच्युअल फंड मध्ये करावी.

 

४. नवीन गुंतवणूकदाराला डेट आणि इक्विटी मधील गुंतवणूक प्रमाण बाबत मनात गोंधळ असल्यास साधे सूत्र वापरावे.

(सूत्र: १०० वजा स्वतःचे वय वर्ष)

येणारे उत्तर हे इक्विटी मधील गुंतवणूकीची अपेक्षित टक्केवारी सांगेल.

समजा आपले वय ३० वर्ष आहे. तर आपण ७०%

(१०० - ३० = ७०) इक्विटी मध्ये गुंतवणूक करू शकता.

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen