कमोडिटी मार्केट हा देखील १ चांगला पर्याय आहे,गुंतवणुकीसाठी तुमचा पोर्टफोलिओ मध्ये डायव्हर्सिफिकेशन साठी, भारता बाहेर देखील गुंतवणुकीसाठी...
तर चला आपण जाणून घेऊ या. कमोडिटी मार्केट बद्दल.
कमोडिटी मार्केट(Commodity Market )
चला आज आपण जाणून घेऊयात भारतामध्ये सर्वात कमी माहिती असलेली गोष्ट म्हणजे कमोडिटी मार्केट(Commodity Market )
हजारो वर्षपुर्वि जेव्हा चलन आस्तित्वात नव्हतं त्या वेळी लोक खरेदी विक्री साठी धान्य, खाद्य पदार्थ, प्राणी, धातू आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असायचा त्या वेळी/काळात वस्तू आणि सेवा चलन म्हणून वापरल्या जायच्या. मात्र, काही कालांतराने चलन व्यवस्था मजबूत झाली मग वस्तू आणि सेवा साठी चाल चा वापर करू लागले. मग हळू हळू कालांतराने धान्य, खाद्य पदार्थ, प्राणी, धातू इत्यादी, गोष्टींची बाजारपेढ ह्यायला लागली. या मध्ये ज्या वास्तूचे मूल्य वजनाने किंवा मापाने ठरवता येतं या वस्तूंचा समावेश आसायचा. या सर्व गोष्टींना कमोडिटी(Commodity) असं म्हंटल जातं. आणि या सर्व गोष्टी जेथे खरेदी व विक्री केल्या जातात त्याला कमोडिटी (commodity) मार्केट म्हण्टलं जातं.
कमोडिटीमध्ये कोणत्या वस्तू?
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ज्याची खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकते त्यांना कमाॅडिटी म्हटले जाते. लोकांच्या दैनंदिन जीवनात कमाॅडिटीचा थेट वापर केला जातो. तसेच इतर कोणतेही आवश्यक उत्पादन तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकणारी वस्तू म्हणजेहीकमोडिटी.
उदा. कच्चे तेल. कमोडिटीमध्ये गव्हापासून डाळींपर्यंत खाद्यतेलापासून ते कच्च्या तेलापर्यंत आणि सोन्यापासून कोळशापर्यंत सर्व वस्तूंचा समावेश होतो.
कमाॅडिटीचे प्रकार(Types Of Commodity)
जग भरामध्ये १०० हुन जास्त कमोडिटी आहेत आणि त्या पैकी पन्नास कमोडिटी मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री होत आहे
ट्रेडर आणि गुंतवणूकदर फक्त प्रमुख ४ कमोडिटी मध्ये भाग घेतात.
मुखतः कमोडिटीचे ४ प्रकार येतात.
१)मौल्यवान धातू - चांदी, सोने
२)ऊर्जा – कच्चे तेल, नैसर्गिक वायू, गॅसोलीन, केरोसीन
३)शेती - मका, सोयाबीन, तांदूळ, गहू इ.
४) बेस मेटल - तांबे, जस्त, निकेल, शिसे, टिन,अल्युमिनियम
कमोडिटीमध्ये गुंतवणूक करणे का महत्त्वाचे ?
पोर्टफोलिओमध्ये विविधता असणे खूप गरजेचे आहे म्हणून कोणत्याही गुंतवणूकदाराने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली पाहिजे. कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने शेअर्सच्या तुलनेत पोर्टफोलिओसाठी वेगळा दृष्टीकोन निर्माण होतो.
शेअर बाजारात घसरण झाल्यास मोठे गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करतात. कारण अनिश्चिततेमध्ये सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो.म्हणून जेव्हा शेर मार्केटखाली जात त्याचं वेळी कॉमोडिटी चे भाव वाढायला लागतात कारण कमोडिटी हा १ सुरक्षित असा पर्याय आहे. दीर्घ मुदतीत सोन्याने महागाईच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत शेअर्समधील गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि कमाॅडिटी मार्केटच्या वाढत्या शक्यतांचा फायदा घेण्यासाठी, गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वस्तूंचा देखील समावेश केला पाहिजे. मात्र, कमाॅडिटी मार्केटमधील गुंतवणुकीसह धोके देखील आहेत. पण तज्ञाच्या मदतीने तुम्ही कमाॅडिटी मार्केटमधून चांगली कमाई करू शकता.
आता आपल्याला माहिती झाली आहे कमोडिटी मर्कट बद्दल.कमोडिटी मार्केट हा देखील १ चांगला पर्याय आहे,
गुंतवणुकीसाठी तुमचा पोर्टफोलिओ मध्ये डायव्हर्सिफिकेशन साठी, भारता बाहेर देखील गुंतवणुकीसाठी...
तर चला आपण जाणून घेऊ या