इक्विटी म्युच्युअल फंड (एमएफ) योजनांमधील (निव्वळ) गुंतवणूक फेब्रुवारी मध्ये ₹२१५,७०० कोटी झाली. ही गुंतवणूक मागील नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) कडील नवीन आकडेवारी नुसार न्यु फंड ऑफरिंग (NFO) आणि म्युच्युअल फंड मधील इतर योजनांमधील गुंतवणूकीचा जोर वाढल्यामुळे
म्युच्युअल फंड गुंतवणूक प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
शेअर बाजारातील घसरण म्हणजेच तात्पुरता विक्री दबाव असला तरीही भारतीय गुंतवणूकदार जाणीवपूर्वक इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवित आहेत.
फेब्रुवारी २०२३ च्या उत्तरार्धात मुख्य निर्देशांक सलग सहा सत्रांमध्ये घसरल्याने बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महागाई दर वाढ, उच्च चलनवाढ, जागतिक मंदीची चिन्हे आणि अदानी समूहाच्या समभागातील घसरणीच्या चिंतेमुळे शेअर बाजारात विक्री दबाव वाढला. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 'निफ्टी' २% घसरला.
इक्विटी फंड मधील सेक्टरल म्युच्युअल फंड योजनांमध्ये सर्वाधिक १३,८५६ कोटी रुपये गुंतवणुकीची नोंद झाली आहे.
इक्विटी म्युच्युअल फंड वर्गवारीत अॅक्सिस बिझनेस सायकल फंड आणि कोटक बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड लॉन्च झाले. ह्या दोन्ही योजनांमध्ये एकूण २,५४० कोटींची गुंतवणूक झाली.
थोडक्यात, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा वाढता आकडा आर्थिक साक्षरता प्रमाण वाढत असल्याचे दर्शवित आहे. वैयक्तिक स्तरावर प्रत्येक गुंतवणूकदार सरासरी पद्धतीचा (एव्हरेजिंग) वापर करून इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे प्रमाण देखील वाढवत आहे.